पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहरातील ख्रिस्ती समाजाच्या आर्थिक विकासासाठी भारतरत्न मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी केली.
ख्रिस्ती समाजातील तरुण-तरुणींना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असून, समाजाला महानगरपालिकेत योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.
रीजनल ख्रिस्तीयन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत उर्फ लुकास केदारी यांनी सांगितले की, आजवर कोणीही समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नव्हते. डॉ. शिलवंत यांनी प्रथमच समाजाच्या समस्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
विद्यमान आमदारांकडून दुर्लक्षित असलेल्या ख्रिस्ती समाजाने डॉ. शिलवंत यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यक्रमास रिजनल ख्रिस्तीयन सोसायटीचे सचिव ॲड. अंतोन कदम, सल्लागार पीटर डिसूझा, सुधीर हिवाळे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०८:३२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: