उरण: सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. यामध्ये अनेक बंडखोर उमेदवारांनी मैदानात धुमाकूळ घातला असून, अधिकृत उमेदवारांसाठी मोठा आव्हान उभा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी, विशेषतः काँग्रेस, उद्धव सेना, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि इतर सहयोगी पक्षांनी अधिकृत उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्त्यांना झोकून देण्याचे आवाहन केले आहे.
अशा परिस्थितीत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा शेलघर येथील निवासस्थानी महाविकास आघाडीचे उमेदवार आशीर्वाद मागण्यासाठी येत आहेत. यामध्ये, अधिकृत उमेदवारांना पाठींब्याचे पत्र देऊन आणि त्यांना विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिला जात आहे.
काल, कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे तरुण आणि तडफदार उमेदवार नितीन सावंत यांनी काँग्रेसचे कर्जत-खालापूर-खोपोली शहराचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, त्यांनी पुढील निवडणुकीच्या तयारीबाबत चर्चा केली आणि जिल्हाध्यक्षांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी कर्जत तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय गवळी, खोपोली शहर अध्यक्ष रिचर्ड जॉन, खालापूर तालुका अध्यक्ष कृष्णा पारंगे, युवक काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष निखील डवले यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
११/०८/२०२४ ०८:४०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: