भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला असून, माजी नगरसेविका सारिका लांडगे आणि संतोष लांडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात प्रवेश केला आहे. बुधवारी यमुनानगर, निगडी येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात त्यांनी पक्षप्रवेश केला.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश विद्यमान आमदार महेश लांडगे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी भाजपचे लक्ष्मण सस्ते, भिमाबाई फुगे यांनीही पक्षाला रामराम ठोकला होता.
सहा महिन्यांपूर्वी एकतर्फी वाटणारी निवडणूक महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी चुरशीची बनवली आहे. त्यांच्या पदयात्रा, रॅली आणि भेटीगाठींना मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद विरोधकांना चिंतेत टाकत आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे 'रिफ्लेक्शन' निवडणुक निकालात दिसेल असा विश्वास व्यक्त केला आहे. भोसरीचा गड या पंचवार्षिक निवडणुकीत ढासळण्याची चिन्हे दिसत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: