शोभायात्रेसह गुणवंत विद्यार्थी व समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा झाला सन्मान
वाकड : अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत महाराजा श्री अग्रसेनजी यांची जयंती अग्रवाल समाज पार्क स्ट्रीट सोसायटी वाकड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोसाइटीमध्ये असलेल्या गणपती मंदिरापासून महाराजा श्री अग्रसेन यांच्या प्रतिमेची मनोभावे शोभायात्रा काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात तसेच `महाराजा श्री अग्रसेन जी की जय` असा जयजकार करीत शोभायात्रा मार्गस्थ झाली.
शोभायात्रेनंतर वाकडच्या हाॅटेल अॅम्बियन्समध्ये महाराजा श्री अग्रसेन जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणी महाराजा अग्रसेन यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच आरती करण्यात आली. या समारंभात अग्रसेन महाराजांच्या १८ मुलांची नावे व गोत्र आणि त्यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
या समारंभाला पवन अग्रवाल, डाॅ. अशोक अग्रवाल, राजकुमार अग्रवाल, नितिन अग्रवाल, मधुसुदन गर्ग, दिनेश अग्रवाल यांच्यासह समाजातील महिला-पुरुष आणि लहान मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होती.
महाराजा श्री अग्रसेन यांची जयंती वाकडमध्ये उत्साहात साजरी
Reviewed by ANN news network
on
१०/०४/२०२४ ०५:१२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०४/२०२४ ०५:१२:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: