वसंत बोराटे यांची माजी महापौर राहुल जाधव यांच्यावर टीका, "राम कृष्ण हरी मंत्रावर राजकारण नको"
भोसरी: "भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा आखाड पार्ट्यांमधून खर्च करणारे आज हिंदू धर्माचे आणि प्रभू श्रीरामाचे दाखले देत आहेत. अशी माजी महापौर राहुल जाधव यांच्या अकलेची कीव येते," अशी घणाघाती टीका माजी नगरसेवक वसंत बोराटे यांनी केली आहे.
वसंत बोराटे यांनी माजी महापौर राहुल जाधव यांच्यावर जोरदार टीका करत सांगितले की, "भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचारात ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’ या घोषणेचा वापर करण्यात येत आहे. मात्र, जाधव यांनी या मंत्राला वेगळा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे, जो पूर्णतः चुकीचा आहे."
बोराटे यांनी स्पष्ट केले की, संत तुकाराम महाराजांनी 'राम कृष्ण हरी' हा मंत्र महाराष्ट्राला दिला, जो वारकरी संप्रदायात पवित्र मानला जातो. "राम, कृष्ण, आणि हरी या तीन देवतांचा महिमा या मंत्रात आहे, जो वारकऱ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे," असे बोराटे यांनी सांगितले. तुतारी हा वाद्य देखील मराठी संस्कृतीत राजेशाही परंपरांच्या प्रतीक म्हणून आदराने वापरला जातो.
विरोधकांकडून या मंत्राला धार्मिक वादात गुंतवण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप करत बोराटे म्हणाले, "राहुल जाधव यांच्या बोलण्यावरून असे दिसून येते की त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे."
वसंत बोराटे यांची प्रतिक्रिया:
"राम कृष्ण हरी मंत्राचा वापर वारकरी संप्रदायात मोठ्या श्रद्धेने होतो. या मंत्रात दुःख आणि संकटे विसरण्याची ताकद आहे. राजकारणासाठी या मंत्राचा अपमान न करता, त्याचा आदर राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे."
माजी महापौर राहुल जाधव यांच्याबद्दल बोराटे यांचे मत:
"माजी महापौर राहुल जाधव यांनी आखाड पार्ट्यांमधून तरुणांना झिंगवण्याचा जो उद्योग केला आहे, त्यांना राम कृष्ण हरी मंत्रावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही," असे बोराटे यांनी रोखठोक शब्दात सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: