पुणे: महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा' निमित्त पुण्यात ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एलोरा बोरा यांचे भरतनाट्यम नृत्य आयोजित करण्यात आले होते. गांधी भवन येथील सभागृहात हा कार्यक्रम झाला. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी होते.
स्नेहा कारंजकर यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. भरतनाट्यम् कलाकार श्रीमती एलोरा बोरा,मायुखी बेजबरूआ यांचा शालिनी टेकाळे यांनी सत्कार केला. तेजस भालेराव यांनी कलाकारांचा परिचय करून दिला.अन्वर राजन यांनी आभार मानले. एड. स्वप्नील तोंडे यांनी सूत्र संचालन केले.डॉॅ.उर्मिला सप्तर्षी,डॉॅ.प्रवीण सप्तर्षी, जांबुवंत मनोहर,श्रीराम टेकाळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
श्रीमती एलोरा बोरा,मायुखी बेजबरू गुवाहटी (आसाम ) मधील प्रसिद्ध भरत नाटयम् कलाकार आहेत.गणेश वंदनेने त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.यानंतर राग मालिका ,ज्योतीस्वरम ,शब्दम, श्रीमन् नारायणा ,अष्टपदी, वैष्णव जन तो, या नृत्य रचना सादर केल्या.मंगलम या नृत्य रचनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.
Reviewed by ANN news network
on
१०/०४/२०२४ ०९:१७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: