मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मराठीजनांना सुखावणारा : देवेंद्र फडणवीस

 



अभिजात साहित्याचा ठेवा तयार करणा-या सर्वांचे हे श्रेय

 

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय समस्त मराठी जनांना सुखावणारा असून खऱ्या अर्थानं अभिजात साहित्याचा ठेवा ज्यांनी तयार केलाअशा सगळ्यांचं हे श्रेय आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी  विविध क्षेत्रातील  नामवंत मंडळींनी शुक्रवारी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यावेळी श्री. फडणवीस यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरेशरणकुमार लिंबाळेपद्मश्री नामदेव कांबळेकवी प्रवीण दवणेसंगीतकार कौशल इनामदारगायिका वैशाली सामंतनरेंद्र पाठकअभिनेत्री मधुरा वेलणकर,  आदित्य दवणेनिकिता भागवतकवी दुर्गेश सोनारबळीराम गायकवाडकवी प्रवीण देशमुखग्रंथालीच्या प्रा. लतिका भानुशालीअरुण जोशी या नामवंतांनी श्री. फडणवीस यांची भेट घेऊन निर्णयाचे स्वागत केले.


यावेळी श्री.फडणवीस यांनी नम्रपणे सांगितले कीआपण जे माझे स्वागत केले ते मी आपला एक प्रतिनिधी म्हणून स्विकारत आहे. सर्व मराठीजनांनी एकमेकांचे अभिनंदन करण्याचा आजचा हा दिवस आहेकेंद्र सरकारच्या अखत्यारीतील हा विषय असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत बहुप्रतिक्षीत असा हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानायला हवेत. शतकानुशतकं ज्या मराठी भाषेने प्रेरणाविश्वासशौर्यकरुणा आपणां सर्वांना दिलीअशा आपल्या मराठी भाषेला राजमान्यता मिळाल्यानंतर आपली सर्वांची जबाबदारी अधिक वाढली आहेअसेही श्री. फडणवीस म्हणाले. मराठी भाषा प्रसार आणि प्रचारासाठी राज्य शासन म्हणून जी भूमिका घ्यायला हवी आणि काम करायला हवे ते आम्ही निश्चित करु अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली. मात्र त्याचवेळी मराठी भाषा ही केवळ संपर्क भाषा न राहताती ज्ञान भाषा कशी होईल तसेच आजच्या युगात मराठी भाषेला ज्ञान भाषा म्हणून कशाप्रकारे प्रस्थापित करता येईल याचा आपण विचार करून त्यादिशेने सर्वांनी प्रयत्न करुया असेही त्यांनी सांगितले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मराठीजनांना सुखावणारा : देवेंद्र फडणवीस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मराठीजनांना सुखावणारा : देवेंद्र फडणवीस Reviewed by ANN news network on १०/०४/२०२४ ०९:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".