पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची काल (गुरुवारी) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोरवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ एकत्रित येत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी 'मी मराठी, आम्ही मराठी', अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस संजय मंगोडेकर, रवी देशपांडे, प्रदीप बोन्द्रे, मंडलाध्यक्ष राजेंद्र बाबर, सोमनाथ भोंडवे, योगेश चिंचवडे, भगवान निकम, प्रसन्न अष्टेकर, विजय शिनकर, कोमल शिंदे, ऍड. दत्ता झुळूक, महेंद्र बाविस्कर, महेश बालकवडे, राकेश नायर, मंडलाध्यक्षा पियुषा पाटील, दीपक भंडारी, जनार्धन तालेरे, निलेश जगताप, सचिन बंडी, दीपाली बेलसरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर भाजपकडून आनंदोत्सव साजरा
Reviewed by ANN news network
on
१०/०४/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
१०/०४/२०२४ ०९:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: