निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम: नाना काटे
पिंपरी (प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवाळीनिमित्त राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नाना काटे यांच्या घरी भेट देऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपला जागा देण्यात आली असताना या जागेसाठी आग्रही असलेल्या नाना काटे यांच्याशी अजित पवारांनी संवाद साधला.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादीचे प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे, निलेश डोके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी चिंचवडमधील एकूण परिस्थितीबाबत कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. "या सर्व बाबींवर विचार करून निर्णय घेतला जाईल," असे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
दुसरीकडे, नाना काटे यांनी, "उपमुख्यमंत्री बारामतीला जाताना मला भेटायला आले होते," असे सांगत आपण निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
भेटीदरम्यान उषा काळे, स्वाती काटे, सतीश दरेकर, नारायण बहिरवडे, राजेंद्र साळुखे, हरिभाऊ तिकोणे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: