उरण : यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर आणि रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या सौजन्याने उलवे नोड येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने 6 ऑक्टोबर रोजी महिलांसाठी खेळ पैठणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या खेळात 100 हून अधिक उत्साही महिलांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते 'रात्रीस खेळ चाले' या लोकप्रिय मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांची उपस्थिती. अपूर्वा नेमळेकर फक्त कार्यक्रमात उपस्थित राहिल्या नाहीत, तर त्यांनी गरबा नृत्याचा आनंद घेतला आणि महिलांसोबत ठेका धरला. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणीत झाला आणि उपस्थित महिलांनी उत्स्फूर्तपणे आनंद घेतला.
अपूर्वा नेमळेकर यांच्या हस्ते खेळ पैठणीच्या विजेत्यांना मानाच्या पैठण्या देण्यात आल्या.
- प्रथम क्रमांक: मोनाली भिलारे
- द्वितीय क्रमांक: पायल घाडगे
- तृतीय क्रमांक: संचिता कोळी
- चतुर्थ क्रमांक: छाया शेट्टी
याशिवाय, लकी ड्रॉद्वारे चार भाग्यवान महिलांना सेमी पैठण्या देण्यात आल्या.
महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटी आणि यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम अतिशय सुरेखपणे आयोजित करण्यात आला होता. उलवे नोड येथील महिला वर्गाने पावसाची पर्वा न करता या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या कार्यक्रमाने महिलांच्या उत्सवात रंग भरला आणि त्यांना आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले. अपूर्वा नेमळेकर यांच्या उपस्थितीमुळे आणि खेळ पैठणीच्या स्पर्धेमुळे नवरात्र उत्सवात एक वेगळाच उत्साह निर्माण झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: