पिंगुळीत ३७ दात्यांनी केले रक्तदान; मदरसा फलाह-ए-उम्मत यांचा उपक्रम

 


कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मदरसा फलाह-ए-उम्मत यांच्या वतीने गोंधीयाळे  येथे मंगळवार १ ऑक्टोबररोजी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदानदिनानिमित्त रक्तदान शिबिराचेआयोजन करण्यात आले होते. याशिबिरात एकूण ३७ दात्यांनी रक्तदान केले. सर्वधर्मीय रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन आयोजकांचे मनोधैर्य उंचावले.

माजी नगरसेवक एजाज नाईक,सिंधुदुर्ग मिल्लत फाऊंडेशनच्यासहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलविविध ठिकाणी मस्जिद, मदरसा,दर्गाह आणि इतर धार्मिक व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून रक्तदानाविषयी जागृकता पसरविण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहेत. २८ सप्टेंबर रोजी सावंतवाडी मुस्लिम वेल्फेअर सोसायटीच्या कादरी मस्जिदमध्ये झालेल्या रक्तदानशिबिरात ३९ दात्यांनी रक्तदान केले होते.

पिंगुळी येथे मंगळवारी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन कुडाळ पोलिस उपनिरीक्षक पालवे यांनी केले. पोलिस अधिकारी रुपेश सारंग, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, माजी नगरसेवक एजाज नाईक, सावंतवाडी रक्तपेढीचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. 

या शिबिराला एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, संत राऊळ महाराज कॉलेजचे प्राध्यापक डॉ. अर्षद हुसेन आवटे, वाडीवरवडेचे माजी सरपंच अमेय धुरी आदींनी भेट देत मदरसा कमिटीचे कौतूक केले.

एजाज नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशा स्वरूपाचे १२ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. तसेच राखीव रक्तदात्यांची सूची बनवून आवश्यकतेनुसार राखीव रक्तदाते उपलब्ध केले जातील, असे सांगितले. प्रकाश तेंडुलकर यांनी उपस्थिताना सदैव ऐच्छिक रक्तदान करण्यासाठी शपथ दिली. सर्व रक्तदात्यांचे आणि रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांचे मदरसा संस्थेच्या वतीने संस्था अध्यक्ष मुश्ताक शेख, हाफीज नाझीम यांनी आभार मानले.

पिंगुळीत ३७ दात्यांनी केले रक्तदान; मदरसा फलाह-ए-उम्मत यांचा उपक्रम पिंगुळीत ३७ दात्यांनी केले रक्तदान; मदरसा फलाह-ए-उम्मत यांचा उपक्रम Reviewed by ANN news network on १०/०५/२०२४ ०१:१३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".