महायुतीचा विजयाचा संकल्प; मीडिया सेंटरमध्ये झाला विशेष कार्यक्रम
पुणे : पुणे मीडिया सेंटर येथे आज दुहेरी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मीडिया टीमने त्यांचा विशेष सत्कार केला. याच वेळी महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चासत्राचे आयोजन करून आगामी निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील, माजी खासदार प्रकाश जावडेकर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या विशेष कार्यक्रमात राजेश पांडे, प्रमोद (नाना) भानगिरे, संजय सोनावणे, संजय आल्हाट, प्रकाश भालेराव आणि यमराज खरात हे महायुतीचे प्रमुख नेतेही सहभागी झाले होते.
पत्रकारांशी झालेल्या संवादात महायुतीच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीची रणनीती आणि विकासाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. या वेळी सर्व उपस्थित नेत्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: