दुटप्पी भूमिका घेणाऱ्या संघटनांना हिंदु जनजागृती समितीचे आव्हान
मुंबई : दिवाळीत फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची चर्चा करणारे तथाकथित पर्यावरणप्रेमी वर्षभर इतर प्रदूषणाबाबत मौन का बाळगतात, असा जाब हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी विचारला आहे.
महाराष्ट्रातील महानगरपालिकांकडून दररोज सोडल्या जाणाऱ्या कोट्यवधी लिटर अतिदूषित पाण्यापासून ते ८ हजार टन घनकचऱ्यापर्यंत अनेक गंभीर पर्यावरणीय समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या संघटना केवळ हिंदूंच्या सणांना लक्ष्य करत असल्याचा आरोप श्री. घनवट यांनी केला.
"महाशिवरात्रीला दुधाच्या अपव्ययावर टीका करणारे, ख्रिसमस किंवा नववर्षाच्या उत्सवातील प्रदूषणाबाबत मात्र मौन बाळगतात. ही दुटप्पी भूमिका स्पष्टपणे हिंदू विरोधी आहे," असे श्री. घनवट यांनी स्पष्ट केले.
हिंदु जनजागृती समितीने महाराष्ट्रभर देवता आणि राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले फटाके न फोडण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली असून, अनेक दुकानदारांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. समिती वर्षभर विविध पर्यावरण विषयक मुद्द्यांवर काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
"'आवाज फाउंडेशन' सारख्या संस्था दिवाळीत सक्रिय होतात, पण इतर धार्मिक उत्सवांमध्ये त्यांचा आवाजच निघत नाही," असा टोलाही श्री. घनवट यांनी लगावला. तथाकथित पर्यावरणप्रेमींच्या या दुटप्पी धोरणापासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: