भोसरी मतदारसंघातील उमेदवारी अर्जाला जोडलेल्या प्रतिज्ञापत्राचे पान गायब केले; मारुती भापकर यांची निवडणूक निर्णय अधिका-याकडे तक्रार

 


भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचे एक पान प्राथमिक छाननी दरम्यान काढून टाकण्यात आल्याचा आक्षेप घेणारी तक्रार २०७ भोसरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवू इच्छिणारे मारुती भापकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्याकडे आज दि. २९  रोजी केली आहे.

भापकर यांनी दिलेल्या तकार अर्जात म्हटले आहे की, आपण उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रातील नोटराईज्ड प्रतिज्ञापत्राचे पान क्रमांक २३ जाणीवपूर्वक काढून टाकण्यात आले आहे. नामनिर्देशन पत्रातून एखादे पान काढून टाकणे ही गंभीर बाब आहे, कारण यामागे माहिती लपविण्याचा किंवा तिचा गैरवापर करण्याचा हेतू असू शकतो.

याबाबत मी खालील मागण्या करत आहे:

१. या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून जबाबदार व्यक्ती/व्यक्तींची ओळख पटवावी.

२. हरवलेले पृष्ठ क्रमांक २२ सादर करण्याची संधी मला द्यावी, कारण माझ्या मते हे पान माझ्या नामनिर्देशन पत्राचा भाग आहे. प्रतिज्ञापत्राचे महत्त्वाचे पान हरवल्यामुळे माझी उमेदवारी धोक्यात येऊ शकते, त्यामुळे ही चूक सुधारण्याची संधी मला मिळावी.

आपण या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व न्याय्य होईल याची खात्री करावी. कृपया चौकशीची स्थिती आणि या संदर्भात केलेल्या कृतीबद्दल मला अवगत करावे.

या प्रकरणी भापकर यांनी आमच्या प्रतिनिधीला माहिती देताना म्हटले की, 

’अर्ज छाननी साठी गेलो असता, तीन टेबलवर या अर्जाची छाननी झाली. या अर्जात काही माहितीपत्रे लागलेली होती. म्हणून या अर्जाची स्टेपल पिन काढून पुन्हा स्टेपल करण्यात आले. या अर्जातील प्रतिज्ञापत्राचे शेवटचे पान गायब करण्यात आले. ही बाब आमच्या एक तासाने लक्षात आल्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी आम्ही खूप वाद घातला. तुमच्या टेबलवर काम करणाऱ्या लोकांनी संगनमत करून ही गडबड केली आहे. उद्या छाननीमध्ये आम्ही नवीन प्रतिज्ञापत्र देतो असे सांगितले असता, उद्या आम्हाला जे योग्य वाटेल तो आम्ही निर्णय घेणार असे ते म्हणाले आहेत. 207भोसरी विधानसभेचा हा अर्ज या षड्यंत्राचा बळी ठरवून बाद होण्याची शक्यता आहे.’


या प्रकरणी आमच्या प्रतिनिधीने निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्याशी दि. २९ ऒक्टोबर २०२४ रोजी २१ वाजून ४७ मिनिटांनी त्यांच्या मोबाईल क्रमांक ९०११०३३००७ वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॊल कट केल्यामुळे संपर्क होऊ शकलेला नाही, त्यांचे स्पष्टीकरण आल्यास त्यालाही प्रसिद्धी दिली जाईल.


भोसरी मतदारसंघातील उमेदवारी अर्जाला जोडलेल्या प्रतिज्ञापत्राचे पान गायब केले; मारुती भापकर यांची निवडणूक निर्णय अधिका-याकडे तक्रार भोसरी मतदारसंघातील उमेदवारी अर्जाला जोडलेल्या प्रतिज्ञापत्राचे पान गायब केले; मारुती भापकर यांची निवडणूक निर्णय अधिका-याकडे तक्रार Reviewed by ANN news network on १०/२९/२०२४ १०:४०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".