चिंचवड : चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण ३२ उमेदवारांनी ४४ नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्याकडे आज १९ उमेदवारांनी २६ नामनिर्देशन पत्रे सादर केली.
दाखल झालेल्या उमेदवारांमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी यांसारख्या प्रमुख पक्षांसह अनेक छोट्या पक्षांचे आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. भाजपकडून शंकर जगताप, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून राहुल कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
विशेष म्हणजे अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. यामध्ये राहुल कलाटे यांनी चार, शंकर जगताप यांनी चार, तर काही उमेदवारांनी दोन-दोन नामनिर्देशन पत्रे सादर केली आहेत.
मतदारसंघात यंदा विविध राजकीय पक्षांसह स्थानिक संघटना आणि अपक्ष उमेदवारांमुळे बहुरंगी लढत होणार असून, निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. छाननीनंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे.
आतापर्यंत नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची नावे आणि त्यांनी दिलेल्या माहितीचा तपशील –
रफिक रशिद कुरेशी (स्वराज्य शक्ती सेना), सचिन वसंत सोनकांबळे (अपक्ष), सचिन अरूण सिद्धे (अपक्ष), अतुल गणेश समर्थ (अपक्ष), काटे विठ्ठल कृष्णाजी (अपक्ष), ऍड. अनिल बाबू सोनवणे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), भाऊसाहेब सोपानराव भोईर (अपक्ष-२, पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी-१), शंकर पांडुरंग जगताप (भाजप-४), अश्विनी लक्ष्मण जगताप (भाजप), काळे सतिश भास्कर (स्वराज्य राष्ट्र निर्माण सेना-१, अपक्ष-१), राजेंद्र मारूती काटे (अपक्ष), विनायक सोपान ओव्हाळ (अपक्ष), रुपेश रमेश शिंदे (अपक्ष), रविंद्र विनायक पारधे (अपक्ष), धर्मराज अनिल बनसोडे (अपक्ष), संदिप गुलाबराव चिंचवडे (अपक्ष), मारूती साहेबराव भापकर (महाराष्ट्र स्वराज पक्ष), भरत नारायण महानवर (राष्ट्रीय समाज पक्ष), अरूण श्रीपती पवार (संभाजी ब्रिगेड-१, अपक्ष-१), मयुर बाबु घोडके (अपक्ष), सिद्धिक इस्माइल शेख (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक), जावेद रशिद शेख (अपक्ष-२), करण नानासाहेब गाडे (अपक्ष), शिवाजी तुकाराम पाडुळे (अपक्ष), राहुल तानाजी कलाटे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार-४), आनंद सुरेश मोळे (हिंदूराष्ट्र संघ), जितेंद्र प्रकाश मोटे (अपक्ष-२), जितेंद्र रामचंद्र वाडघरे (वंचित बहुजन आघाडी), जसविंदर सिंग इंदूपाल सिंग स्तु (अपक्ष), सिमा देवेंद्रसिंग यादव (अपक्ष), राजेंद्र पुंडलिक गायकवाड (बहुजन समाज पार्टी), राजेंद्र आत्माराम पवार (अपक्ष)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: