काल खंडेनवमी होती. तसं पाहिलं तर हा दसऱ्याच्या आधीचा एक मंगल दिवस. पण, तो काल मोठ्या धावपळीत गेला.
एका वृद्ध स्त्रीला तिचे कुटुंबीय घरी नसल्यामुळे दवाखान्यात नेण्याची पाळी आली त्या स्त्रीला ओपीडीमध्ये नेल्यानंतर तिची तब्येत अचानक बिघडल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. संपूर्ण दिवस त्यात मोडला.
रात्री उशिरा घरी परतल्यानंतर नित्याच्या सवयीप्रमाणे दिवसभरातभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी म्हणून पीसी सुरू केला. डॉक्टर के अनिल रॉय यांच्या पोस्टची लिंक व्हाट्सअपमध्ये येऊन पडली होती.
डॉक्टर रॉय हे एक जिंदादिल आणि खुशमिजाज व्यक्तिमत्व आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ जबाबदारी सांभाळली. अलीकडेच ते निवृत्त झाले त्यानंतर त्यांनी आपला लेखनाचा छंद जोपासण्यासाठी एक ब्लॉग सुरू केला. वेगवेगळ्या विषयांवर, ताज्या घडामोडींवर संयतपणे व्यक्त होणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यांचे लेखन इंग्रजीमध्ये आणि वाचनीय असते.
एकदा मी त्यांना; डॉक्टर आपण मराठीत का लिहित नाही? असे सहज म्हटले त्या त्यावर मराठीमध्ये अभिव्यक्त होताना मला थोड्या अडचणी येतात असे ते म्हणाले. स्वाभविक आहे; इंग्रजी माध्यमातून झालेले शिक्षण, मल्याळी ही मातृभाषा यामुळे ते या मातीत वाढले तरी मराठी ही त्यांची तिसरी भाषा ठरते. डॉक्टर बोलतात उत्तम मराठी; पण मराठी लिहिणे त्यांना अडचणीचे वाटते.
तर... त्यांनी आपल्या आईकडच्या आजोळच्या घराची छायाचित्रे आपल्या ब्लॉगवर टाकली होती. निसर्गरम्य देवाच्या प्रदेशातील, केरळातील ती छायाचित्रे पाहून सहज माझ्या मनात ’खेड्यामधले घर कौलारू” या जुन्या मराठी गाण्याच्या ओळी रुंजी घालू लागल्या. डॉक्टरांच्या त्या पोस्टवर कॉमेंट करण्यासाठी म्हणून मूळ गाणे आणि त्याचा इंग्रजी अनुवाद असे मी तयार केले. आणि माझा अभिप्राय डॉक्टरांना कळवला.
पण त्यानंतरही हे गाणे डोक्यात घर करून बसले होते. इंग्रजी अनुवादही छान जमला होता. त्यामुळे मग त्या शब्दांना इंग्लिश कंट्रीसाइड संगिताचा साज चढवून गाण्याचे रूप देण्याचा प्रयत्न केला. आणि, त्यातून हे इंग्लिश गाणे काल रात्री अडीच वाजता पक्षी,, विजयादशमीच्या पहाटे जन्माला आले.
विजयादशमीच्या शुभेच्छा म्हणून आज आपणाला या लेखाची लिंक पाठवतो आहे. त्यात हे गाणे आहे. जरूर ऐका. आणि, आपला अभिप्राय कळवा. पुन्हा एकदा आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! धन्यवाद!!
मूळ मराठी गाणे असे आहे....
आठवणींच्या आधी जाते
तिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारू !
हिरवी श्यामल भवती शेती
पाऊलवाटा अंगणी मिळती
लव फुलवंती, जुई शेवंती
शेंदरी अंबा सजे मोहरू !
चौकट तीवर बाल गणपती
चौसोपी खण स्वागत करती
झोपाळ्यावर अभंग कातर
सवे लागती कड्या करकरू !
माजघरातील उजेड मिणमिण
वृद्ध कांकणे करिती किणकिण
किणकिण ती हळू, ये कुरवाळू
दूरदेशीचे प्रौढ लेकरू !
त्याचा इंग्लिश अनुवाद हा आहे....
Where memories lead, the mind's blue bird flies,
To a village house with tiled roof that lies.
Green fields surround, paths meet at the gate,
Jasmine and chrysanthemums bloom, elate.
The mango tree adorns, dressed in red hue,
Lord Ganesha's frame, a childhood view.
The porch welcomes with its four-sided space,
On the swing, devotional songs embrace.
In the inner room, a dim light still glows,
Old bangles tinkle, their sound ebbs and flows.
A gentle caress, a soft lullaby,
For the grown child from a land far and nigh.
आणि ही त्याची धून,,,,,,
Reviewed by ANN news network
on
१०/१२/२०२४ ०१:५१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: