ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा? : आशिष शेलार

 


 

मुंबई : अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकला पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला आहे. कालपासून त्यांची व पिलावळांची वक्तव्य पाहतोय,हा बेशरमपणा आहे. अफजल गुरुची ‘बरसी’ करता तशी आता अक्षय शिंदेची पण ‘बरसी’ करणार काअसा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला.मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.


शेलार पुढे म्हणाले कीविरोधकांची काय  वक्तव्य आहेतकाय सांगत आहातकाय संदेश आहेकाय अर्थ काढायचा थोडा अभ्यास करून बोला. एवढा थयथयाट करतायकाय सांगायचे आहे तुम्हालापोलिसांनी गोळ्या खायच्या कायत्या पिडित बच्चूची मानसिकता तरी समजून घ्या.त्यांनी दिलेल्या पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहातत्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराबाबततो झाला की नाहीपोलिसांनी काही नाही केलेया सर्व गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहे कायकुठल्या थराला गेला तुम्ही?याचे राजकारण करता की तो अक्षय शिंदेगुन्हेगार तो लिंगपिसासू त्याची माळ हे जपत आहातअसा थेट सवाल करीत तो लिंगपिपासू आणि हे सत्तापिसासूअशा शब्दांत ॲड शेलार यांनी हल्लाबोल केला.


 शरद पवार साहेब तुम्ही काय बोलत आहात हलगर्जीपणाआरोपीने पोलिसांवर हात टाकल्यावर काय त्यांनी भजन करायचे कापोलिसांच्या बंदुकीचा जो हात घालेलत्याला ठोकयलाच पाहिजे. आम्ही पुर्णपणे पोलिसांच्या पाठीशी आहोत. उबाठा गट आता ज्या अधिकाऱ्यांनी आरोपीला ठोकले त्या अधिकाऱ्याला आता काय जोडे मारो करणार कायअसा खोचक सवाल ही त्यांनी केला.


महाविकास आघाडीला सवयच लागली आहेआतंकवादीगुन्हेगार असेल त्याला ठोकला की त्याचे फोटो घ्यायचे व गळा काढायचा. अफझल गुरुची ‘बरसी’ केलीत उद्या अक्षय शिंदेची ‘बरसी’ करतील.


कुठे आहेत उद्धव ठाकरेत्या लिंगपिसासू विरोधात बोलताना का जीभ अडकत आहे यांची आदित्य ठाकरे आज ट्विट करीत आहेत. मग त्यांच्याकडे माहिती होती तर ते पोलिसांत का गेले नाहीत?त्यांनी हे कर्तव्य का नाही केले?नागरिक म्हणून चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून ते पोलिसांकडे का गेले नाहीत?विरोधकांवर शहरी नक्षलवादाचा प्रभाव आहेत्यांच्यासाठी ईडी चुकीचेपंतप्रधान व मुख्यमंत्रीपद चुकीचेवातावरण असे निर्माण करायचे की या देशात कायदाच नाही.


अक्षय शिंदेने बंदुक घेतली तर या पोलिसांनी काय करायचे होतेबरं ज्याला ठोकला तो कोण आहे चिमुरडीसोबत प्रकार केला त्या कुटुंबाची काय मानसिक अवस्था असेलपोलीस आणि तपास यंत्रणासमोर त्यांची साक्ष झाली आहे. काही पुरावे गोळा केले गेलेतआज ते सगळे खोटे ठरवतायअसा थेट सवाल मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांनी केला आहे.

ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा? : आशिष शेलार ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा? : आशिष शेलार Reviewed by ANN news network on ९/२५/२०२४ ०८:३०:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".