ठाणे : बदलापूर येथील अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस कस्टडीत संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तळोजा कारागृहातून बदलापूर न्यायालयात नेण्यात येत असताना हा प्रकार घडला.
गेल्या महिन्यात बदलापूर पूर्वेकडील एका नामांकित शाळेत दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यास अटक करण्यात आली होती. मात्र आता त्याच्या मृत्यूची बातमी समोर येत असून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तळोजा कारागृहातून बदलापूर न्यायालयात नेत असताना अक्षय शिंदेने एका पोलीस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यातून तीन फैरी झाडल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दुसऱ्या अधिकाऱ्याने त्याच्यावर गोळीबार केला, ज्यामध्ये अक्षय गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. काहींचे म्हणणे आहे की ही आत्महत्या असू शकते, तर अन्य काहींचा दावा आहे की हे एक बनावट चकमक (एन्काउंटर) असू शकते.
या आरोपीने अल्पवयीन
विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची
लाट उसळली होती.
स्थानिक नागरिकांनी रेल रोको आंदोलन करत आरोपीला
कडक शिक्षेची मागणी
केली होती. या
आंदोलनादरम्यान रेल्वे
वाहतूक देखील विस्कळीत झाली
होती.
Reviewed by ANN news network
on
९/२३/२०२४ ०८:२७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: