शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
उरण : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० साली झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९४ वा स्मृतीदिनाचा कार्यक्रम बुधवारी ( दि २५) खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय इतमानाने पोलिसांनी बंदूकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली.
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत देशभरात आंदोलने सुरु होती. इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता.त्याच वेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० साली जंगल सत्याग्रह आंदोलन सुरु करण्यात आले होते. शांततामय रितीने सुरु असलेल्या जंगल सत्याग्रहात शेतकरी, आगरी, आदिवासी असे सुमारे दोन हजार आंदोलक सहभागी झाले होते. यामध्ये २० ते २२ वयोगटातील युवकांचाच अधिक सहभाग होता. जंगल का कायदा तोड दिया, इंग्रज भारत छोडोचा नारा देत चिरनेर येथील आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर जुलमी ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछुट लाठीचार्ज,गोळीबार केला. या गोळीबारात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादेव कातकरी (चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे),रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे) आनंदा माया पाटील (धाकटी जुई),आलु बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर अनेकजण जखमी झाले होते.याची स्मृती निरंतर राहावी म्हणून चिरनेर येथे हुतात्मा दिन साजरा केला जातो. या कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेच्या (शिंदे गट )च्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी हुतात्मा स्मारकचे पूजन करत त्यांना अभिवादन केले .यावेळी उरण विधानसभेचे जिल्हा प्रमुख अतुल भगत,जिल्हा संघटिका मेघाताई दमडे,उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे,उरण तालुका संपर्क प्रमुख -दिपक ठाकूर,उरण तालुका संघटक चंद्रकांत पाटील,महिला तालुका प्रमुख प्रणाली म्हात्रे,चाणजे विभाग प्रमुख अक्षय म्हात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
हुतात्म्यांच्या त्यागातूनच स्वातंत्र्य मिळाले आहे.त्याचे स्मरण होणे तसेच या परिसराचे पवित्र राखणे आवश्यक आहे.या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकसंघ होणे गरजेचे असल्याचे मत मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच भास्कर मोकल यांनी केले तर सूत्रसंचालन राजेंद्र भगत यांनी केले आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधून चिरनेर गावच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या पी पी खारपाटील कंपनीचे संचालक पी पी खारपाटील राजाशेठ खारपाटील समीर खार पाटील,सागर खार पाटील यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत नागरी सत्कार करण्यात आला.
चिरनेर येथे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना शासकीय मानवंदना
Reviewed by ANN news network
on
९/२८/२०२४ ०८:०५:०० AM
Rating:
Reviewed by ANN news network
on
९/२८/२०२४ ०८:०५:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: