पुणे: महाराष्ट्र राज्यात “घरोघरी तिरंगा” या उपक्रमाची धडाकेबाज सुरुवात करण्यात आली असून, ९ ते १५ ऑगस्ट २०२४ दरम्यान राज्यभरात विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संचालनालयाने ८ ऑगस्ट रोजी मार्गदर्शक सूचना जारी करून या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेतर्फे शहरात विविध ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली.
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय:
औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत "हर घर तिरंगा" या अभियानांतर्गत अहिल्यादेवी होळकर शाळा, चव्हाण नगर येथे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य विभागाचे सर्व सेवक व अधिकारी यांनी घरोघरी तिरंगा मोहिमेची प्रतिज्ञा घेतली. या प्रसंगी आयोजित प्रभात फेरीद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय:
सरहद स्कूलमध्ये "हर घर तिरंगा" उपक्रमांतर्गत तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच प्रभाग क्रमांक ४२, आंबेगाव येथील जिल्हा परिषद शाळा व सन ब्राईट स्कूलमध्येही या मोहिमेची प्रतिज्ञा घेण्यात आली. म.न.पा. चंद्रभागा चौक येथे थोरवे शाळेमध्येही तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय:
वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात ज्येष्ठ अभिनेते श्री. आनंद इंगळे आणि भारतीय क्रिकेट खेळाडू श्री. केदार जाधव यांचा त्यांच्या निवासस्थानी तिरंगा देऊन सत्कार करण्यात आला.
नगर रोड क्षेत्रीय कार्यालय:
नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत लोहगाव येथील श्री संत तुकाराम प्राथमिक विद्यालय येथे "हर घर तिरंगा" या अभियानांतर्गत रॅली काढून तिरंगा शपथ घेण्यात आली. संत गोरोबा बालविद्यानिकेतन, विमान नगर येथेही तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.
हडपसर क्षेत्रीय कार्यालय:
मनपा शाळा क्रमांक ८३, मुलांची माळवाडी हडपसर येथे घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.
कोंढवा क्षेत्रीय कार्यालय:
आमदार सूर्यकांत लोणकर शाळा क्रमांक १०८ बी. सिद्धार्थ नगर, कोंढवा येथे तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.
प्रभाग क्रमांक आठ इंदिरा गांधी शाळेने घेतली 'हर घर तिरंगा'ची शपथ
इंदिरा गांधी शाळेने प्रभाग क्रमांक आठ अंतर्गत 'हर घर तिरंगा, घर घर तिरंगा' अभियानाची शपथ घेतली. सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि DSI श्री महेंद्र सावंत यांच्या सूचनेनुसार आज एक भव्य तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती. ही रॅली कसबा पेठ, तांबट हौद, पवळे चौक, शिंपी आळी या परिसरात काढण्यात आली.
विद्यार्थ्यांना तिरंगा झेंड्याचे महत्त्व पटवून देण्यात आले आणि देशप्रेमी घोषणा देत परिसरात रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर विद्यार्थ्यांना खाऊ आणि पेन वाटप करून तिची सांगता करण्यात आली. या उपक्रमात राजमाता जिजामाता शाळेचे १५० विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आरोग्य निरीक्षक श्री. कृष्णा अवघडे, कनिष्ठ अभियंता श्री. साबळे, मोकदम अविनाश मोहिते, मोकदम सुनील मोरे यांचा सहभाग होता.
धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय:
धनकवडी-सहकार नगर क्षेत्रीय कार्यालयातर्फे १५ ऑगस्ट निमित्त भारतीय विद्यापीठ मागील गेट व्यापारी भागात डीपी क्लीन ड्राईव्ह घेण्यात आला. सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे यांच्या हस्ते नागरिकांना घरोघरी लावण्यासाठी तिरंगा ध्वज देण्यात आला.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह:
घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत नाट्य अभिनेता श्री. संकर्षण कऱ्हाडे यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात तिरंगा शपथ घेतली.
मुंढवा आरोग्य कोठी (प्रभाग क्रमांक २२):
राजश्री शाहू महाराज विद्यालय येथे घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांमार्फत प्रतिज्ञा घेण्यात आली.
उद्यानांमध्ये सेल्फी पॉईंट्स:
नानासाहेब पेशवे तलाव उद्यान कात्रज, स्वामी विवेकानंद उद्यान कोंढवा, आणि शिवरकर उद्यान वानवडी येथे नागरिकांकरिता सेल्फी पॉईंट्स उभारण्यात आले आहेत.
या उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम जागविण्यासाठी आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय तिरंग्याबद्दल आदर व अभिमान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. "घरोघरी तिरंगा" उपक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रात देशभक्तीची भावना निर्माण झाली असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
Reviewed by ANN news network
on
८/१४/२०२४ ०९:००:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: