यशस्वी एज्युकेशन सोसायटीचा उपक्रम
पिंपरी: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुरु झालेल्या हर घर तिरंगा मोहिमेत यंदाही यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
देशवासियांमध्ये राष्ट्रभावना वाढीस लागावी, ज्या शूरवीर स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्या योगदानाचे स्मरण व्हावे, म्हणून या उपक्रमात युवकांसह लहान थोर सर्वजण सहभागी झाले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून समाजमाध्यमावर आणि पोर्टलवर सुद्धा अपलोड केले.
राष्ट्र उभारणीमध्ये युवकांचे योगदान महत्वाचे असून महाविद्यालयीन काळात त्यांच्यातील राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी हर घर तिरंगा सारख्या उपक्रमांमधील युवा वर्गाचा सहभाग खूप मोलाचा ठरतो असे मत आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केले.
यावेळी तिरंगा हा वैयक्तिक अभिमान आणि सामूहिक एकतेचे प्रतीक बनवण्याचा या मोहिमेचा उद्देश असून तिरंगा अभिमानाने घेऊन जाण्याची आणि सांस्कृतिक वारशाचे रक्षण करण्याची आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण ठेवण्याची विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. प्रा. महेश महांकाळ यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Reviewed by ANN news network
on
८/१४/२०२४ ०८:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: