सशस्त्र सराईत गुन्हेगार जेरबंद; वाकड पोलिसांची कामगिरी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड पोलीस स्टेशनने एक मोठी कामगिरी बजावली आहे. पोलिसांनी गावठी पिस्तुल व जिवंत राऊंडसह एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईतून २७ हजार रुपये किंमतीचे पिस्तूल आणि काडतुस जप्त करण्यात आले आहे.

गोरख प्रभू सातपुते (वय २९, रा. पवारनगर, थेरगाव, वाकड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

वाकड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाला गजानन नगर, रहाटणी परिसरात एका व्यक्तीकडे बेकायदेशीर पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. बातमीदाराच्या माहितीवरून पथकाने सापळा लावला आणि गोरख सातपुते याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.

या आरोपीवर आधीच गेवराई, जि. बीड, वाकड, सांगवी आदी पोलीसठाण्यात ०४  गंभीर गुन्हे दाखल आहेत:


सशस्त्र सराईत गुन्हेगार जेरबंद; वाकड पोलिसांची कामगिरी  सशस्त्र सराईत गुन्हेगार जेरबंद; वाकड पोलिसांची कामगिरी Reviewed by ANN news network on ८/२८/२०२४ ०४:०८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".