प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात अमरावतीत भाजपाचा ‘जागर जाणीवेचा’!

 


चंद्रशेखर बावनकुळे यांचे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मौन

 

अमरावती : बदलापूर येथे झालेली दुर्दैवी घटना मानवतेला काळीमा फासणारी असून अशा घटना होऊ नयेत म्हणून भाजपातर्फे आज महाराष्ट्रभर 'जागर जाणिवेचाहे अभियान राबविण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकाळी अमरावती येथील इर्विन चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मौन धारण केले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, "केवळ बदलापूरच नव्हेजिथे कुठे अशा घटना घडतात त्या राजकारणाचा विषय कदापि होऊ शकत नाही. मानवतेला त्या काळिमा फासणाऱ्या असतात. ही प्रवृत्ती समाजाने ठेचून काढली पाहिजे. श्री बावनकुळे यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. यावेळी अमरावती जिल्हाध्यक्ष खासदार डॉ.अनिल बोंडे,माजी खासदार नवनीत राणाभाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ.आशिष देशमुखजयंत डेहनकर यांच्यासह सर्व प्रमुख भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

बदलापूर घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावीअशी मागणी सरकारकडे केली असे सांगून बावनकुळे म्हणाले,अशा संवेदनशील घटनांकडे राजकीय हेतुने पाहू नये. पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी काम करायला पाहिजेत्या कुटुंबीयांना आधार द्यावा. राजकारण करण्यासाठी अनेक विषय आणि घटना असतात. अशा पद्धतीच्या अनेक घटना महाविकास आघाडीच्या काळातही  झाल्यापण त्यावेळी आम्ही विरोधी पक्षात असताना सरकारच्या पाठिशी राहण्याचे काम केलेअशी आठवण त्यांनी करून दिली.

 

       “केवळ बदलापूरच नव्हेजिथे कुठे अशा घटना घडतात त्या राजकारणाचा विषय कदापि होऊ शकत नाही. मानवतेला त्या काळिमा फासणाऱ्या असतात. ही प्रवृत्ती समाजाने ठेचून काढली पाहिजे."

 

चंद्रशेखर बावनकुळे

प्रदेश अध्यक्षभाजपा

प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात अमरावतीत भाजपाचा ‘जागर जाणीवेचा’! प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात अमरावतीत भाजपाचा ‘जागर जाणीवेचा’! Reviewed by ANN news network on ८/२४/२०२४ ०७:१०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".