झोपडपट्ट्यांमध्ये महापालिका सुरू करणार अभ्यासिका

 


मोशी येथे अभ्यासिकेचे उद्घाटन

पिंपरी :  शहरातील झोपडपट्ट्यांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली.

मोशी येथील संजय गांधीनगर परिसरात 'योजक' या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

श्री. सिंह म्हणाले, "या अभ्यासिकेच्या धर्तीवर शहरातील इतर झोपडपट्ट्यांमध्येही सर्वांगीण विकास केंद्रे उभारण्यात येतील. यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जाईल."

उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी या उपक्रमाचे महत्त्व विशद करताना सांगितले, "शिक्षणाच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांना विकासाची संधी मिळते. विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल."

अभ्यासिकेत ५वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि करिअरविषयक मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच अभ्यासासाठी पुस्तके व शैक्षणिक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, कार्यकारी अभियंता दत्तात्रय रामगुडे, 'योजक' संस्थेच्या संस्थापिका रेणू इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आयुक्त सिंह यांनी या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांचा विशेष सत्कार केला. त्यांनी शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत असे उपक्रम राबविण्याचे आवाहनही केले.

या उपक्रमामुळे झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार असून, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

झोपडपट्ट्यांमध्ये महापालिका सुरू करणार अभ्यासिका झोपडपट्ट्यांमध्ये महापालिका सुरू करणार अभ्यासिका Reviewed by ANN news network on ८/२२/२०२४ ०७:३९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".