नांदेड: किनवट तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यालयात कार्यरत असलेले कंत्राटी ऑपरेटर अविनाश विश्वनाथ भुरेवार यांना ३,५०० रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी एका व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी शिरपूर ग्रामपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सात मस्टर पंचायत समिती, किनवट येथे सादर केले होते. या मस्टरवर पुढील कार्यवाही करण्यासाठी अविनाश भुरेवार यांनी तक्रारदाराकडे प्रत्येकी ५०० रुपये अशी एकूण ३,५०० रुपयांची लाच मागणी केली होती.
तक्रारदाराने या मागणीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे दिली. तक्रारीच्या आधारे लाचलुचपत विभागाने पडताळणी केली असता, भुरेवार यांनी पंचासमक्ष लाच मागणीची पुष्टी केली. त्यानंतर, २१ ऑगस्ट २०२४ रोजी सापळा रचण्यात आला आणि भुरेवार यांनी ३,५०० रुपये लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
भुरेवार यांच्या विरोधात किनवट पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२४ ०४:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: