पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा : नाना काटे

 


पिंपरी : पिंपरी-चिंचवड:बदलापूर येथे शाळेत झालेल्या दुर्दैवी लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर, पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेता नाना काटे यांनी याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना पत्र दिले आहे.

 शहरातील अनेक शाळांमध्ये अद्यापही सीसीटीव्ही कॅमेरे बसविले गेले नाहीत किंवा जेथे बसविण्यात आले आहेत, तेथील अनेक कॅमेरे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अनेक पालकांनी शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेच्या अभावाबाबत तक्रारी नोंदवल्या असून, शाळांच्या परिसरात अधिक प्रभावी पद्धतीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारली जावी, अशी मागणी केली जात आहे. पालकांच्या या मागणीला अनुसरून महापालिकेच्या वतीने तातडीने तपासणी करून, शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे आणि दीर्घकालीन माहिती साठवू शकणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश जारी करण्यात यावेत, अशी मागणी काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

शाळांमधील विद्यार्थी सुरक्षित रहावेत, यासाठी या उपाययोजनांचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. ही मागणी लालफितीत अडकू नये आणि त्वरित निर्णय घेऊन कार्यवाही करावी, अशीही मागणी नाना काटे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा : नाना काटे पिंपरी-चिंचवड शहरातील शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा : नाना काटे Reviewed by ANN news network on ८/२२/२०२४ ०८:१६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".