सनातन धर्म नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांचे षड्यंत्र: चेतन राजहंस

 


पुणे: सनातन संस्थेच्या प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी आरोप केला आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्यांमध्ये सनातन संस्थेला गुंतवण्याचे षड्यंत्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि शहरी नक्षलवाद्यांनी रचले होते. हे आरोप त्यांनी सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘अंधश्रद्धा निर्मूलन कि छुपा अर्बन नक्षलवाद’ या विशेष कार्यक्रमात केले. पुण्यातील लोकमान्य सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘असत्यमेव जयते’ या पुस्तकाचे लेखक श्री. अभिजित जोग यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.

राजहंस यांनी म्हटले की, डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येत सनातन संस्थेला बळीचा बकरा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला. न्यायालयाने हिंदु जनजागृती समितीचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सनातन संस्थेचे साधक विक्रम भावे, आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना निर्दोष मुक्त केले. मात्र, त्यांना यावेळी भोगावे लागलेले कारागृहवास कोण भरून देणार?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सनातन धर्म नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांचे षड्यंत्र: चेतन राजहंस सनातन धर्म नष्ट करण्यासाठी शहरी नक्षलवाद्यांचे षड्यंत्र: चेतन राजहंस Reviewed by ANN news network on ८/२१/२०२४ ०४:४७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".