बदलापूर येथे पत्रकार महिलेला अर्वाच्य भाषा वापरणार्‍या वामन म्हेत्रेंवर कारवाई करा; पिंपरीतील पत्रकारांची मागणी

 

पिंपरी : बदलापूर येथे झालेल्या जन आक्रोश आंदोलनाच्या वेळी महिला पत्रकार मोहिनी जाधव यांना अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या माजी नगराध्यक्ष वामन म्हेत्रे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांनी नायब तहसीलदार जयराज देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हेत्रेंच्या विरुद्ध कठोर कायदेशीर पावले उचलण्याची मागणी केली आहे.

या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण कांबळे यांनी महिलांवरील अत्याचारांवर शासनाच्या तात्काळ कारवाईची आवश्यकता व्यक्त केली. यावेळी गोविंद वाकडे यांनी वामन म्हेत्रेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, पत्रकार सचिन चपळगावकर यांनी या वर्तनाची गंभीरता अधोरेखित करत म्हटलं की, भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.

बदलापूर येथे पत्रकार महिलेला अर्वाच्य भाषा वापरणार्‍या वामन म्हेत्रेंवर कारवाई करा; पिंपरीतील पत्रकारांची मागणी बदलापूर येथे पत्रकार महिलेला अर्वाच्य भाषा वापरणार्‍या वामन म्हेत्रेंवर कारवाई करा; पिंपरीतील पत्रकारांची मागणी Reviewed by ANN news network on ८/२१/२०२४ ०५:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".