छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील ओहर गावातील पूजा शिवराज पवार या १६ वर्षांच्या मुलीला 'माझ्यावर प्रेम कर नाहीतर तुझ्या भावाला मारून टाकीन' अशी धमकी कासिम यासीन पठाण या अल्पसंख्य तरुणाने दिली त्यामुळे तिने १८ ऑगस्ट रोजी विहीरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींना अटकही केली. मात्र, त्यानंतर आरोपीच्या भावाने आपल्या काही साथीदारांसह पूजाच्या घरासमोर हातात तलवारी आणि चाकू घेऊन 'आज जेल, कल बेल, फिर वही पुराना खेल'अशा शब्दात धमकावल्याची घट्ना समोर आली आहे.
पूजा पवार ही ओहर गावातील जटवाडा रोडवर राहत होती. कासिम यासीन पठाणने मागील आठ महिन्यांपासून तिच्या मागे लागून तिच्यावर प्रेम करण्याचा तगादा लावला होता. पूजा यामुळे खूप त्रस्त झाली होती. रक्षाबंधनाच्या वेळेस तिने या त्रासाबद्दल कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी पठाणला समजावले असले तरी त्याने त्रास देणे थांबवले नाही.शेवटी १८ ऑगस्ट रोजी, पूजाने गावातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.पोलिसांनी या प्रकरणात ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे, पण फक्त दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींच्या धमक्यांमुळे पवार कुटुंबीय दहशतीखाली आहेत.
अशातच मोकाट आरोपींनी पूजाच्या कुटुंबीयांना घरासमोर चाकू आणि तलवारी दाखवून धमकावले आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२१/२०२४ ०४:०४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: