दिशा सालीयानच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंनी पुराव्यांसकट उत्तर द्यावे: आ. नितेश राणे यांचे आव्हान

 


मुंबई : दिशा सालीयानच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात शिवसेना नेते आ. आदित्य ठाकरे यांना थेट आरोपांना सामोरे जावे, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे आ. नितेश राणे यांनी दिले आहे. त्यांनी पळ काढण्यापेक्षा पुराव्यांसकट उत्तर द्यावे, असे म्हणत आ. राणे यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली.

छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आदित्य ठाकरे यांना या प्रकरणात प्रश्न विचारण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आदित्य ठाकरे यांनी त्या वेळी उत्तर देण्याची हिंमत न दाखवता पळ काढल्याचा आरोप आ. राणे यांनी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

आ. राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आणि संजय राऊत अलीकडे महिला अत्याचारावर बोलत आहेत, मात्र आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालीयान प्रकरणात गंभीर आरोप झाले आहेत. आदित्य यांनी जर निर्दोष असाल तर ८ जूनच्या लोकेशनचे पुरावे सादर करावेत आणि आपल्यावर होणारे आरोप खोटे असल्याचे सिद्ध करावे. त्यानंतर मी ठाकरे कुटुंबाची माफी मागायला तयार आहे."

राणे यांनी हेही विचारले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे यांना या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देण्यास सांगितले का नाही? संजय राऊत यांच्यावर डॉ. स्वप्ना पाटकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांकडे लक्ष दिले गेले नाही, असा आरोप करत आ. राणे यांनी महिला अत्याचार प्रकरणी बोलण्यापूर्वी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आत्मपरीक्षण करावे, असेही म्हटले.

दिशा सालीयानच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंनी पुराव्यांसकट उत्तर द्यावे: आ. नितेश राणे यांचे आव्हान दिशा सालीयानच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंनी पुराव्यांसकट उत्तर द्यावे: आ. नितेश राणे यांचे आव्हान Reviewed by ANN news network on ८/२६/२०२४ ०३:४४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".