मातंग समाजाच्या पारंपरिक व्यवसायांना चालना देणार : आमदार अमित गोरखे

 


नांदेड: महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या पारंपरिक व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी दिले आहे. बहुजन संवाद यात्रेच्या निमित्ताने नांदेड येथे आलेल्या गोरखे यांनी मातंग समाजाच्या वाड्यावस्त्यांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

आमदार गोरखे यांनी केरसुणी आणि दोरखंड या पारंपरिक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना भेट दिली. तसेच शांतीनगर व प्रीतीनगर या वसाहतींमधील झाडूविक्रेत्यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी समाज मंदिर व घरकुल योजनांबाबत प्रयत्न करण्याचेही आश्वासन दिले.

गोरखे म्हणाले, "आधुनिक काळातही पारंपरिक झाडूंचे महत्त्व कायम आहे. विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या व्यवसायांना शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी मी आग्रही प्रयत्न करणार आहे."

या भेटीला माजी आमदार अविनाश घाटे, प्रमोद गायकवाड, सचिन गुंडाळे, रामप्रसाद कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आमदार गोरखे यांची बहुजन संवाद यात्रा सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असून, त्यांच्या या अभिनव उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. 

मातंग समाजाच्या पारंपरिक व्यवसायांना चालना देणार : आमदार अमित गोरखे मातंग समाजाच्या पारंपरिक व्यवसायांना चालना देणार :  आमदार अमित गोरखे Reviewed by ANN news network on ८/२४/२०२४ ०६:५१:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".