पुणे (लोहगाव): पुण्यातील लोहगाव विमानतळ परिसरात कार्यक्रमाच्यावेळी डीजे बरोबर आकाशात प्रखर लाइटबिम्सचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी जारी केले आहेत. ८ ऑगस्टपासून पुढे दोन महिने हा आदेश लागू असणार आहे.
आदेशात म्हटले आहे की, पुणे शहरातील लोहगाव टेक्नीकल विमानतळ व नागरी विमानतळावर दिवसा व रात्रौ वेगवेगळ्या एअरलाईन्सच्या तसेच भारतीय वायुसेनेच्या विमानांचे आणि हेलिकॉप्टर्सचे उतरणे व उड्डाण सुरू असते. विशेषत: रात्रीच्या वेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण दाखवण्यासाठी रनवेवर आणि एटीसी टॉवरकडून संकेतासाठी लाईट्सचा उपयोग केला जातो.
भारतीय वायुसेनेने निदर्शनास आणले आहे की, विमानतळाच्या जवळच्या परिसरात विविध कार्यक्रमाच्या वेळी आकाशात प्रखर लाईट बीम्सचा वापर केला जातो, ज्यामुळे वैमानिकांचे डोळे दिपून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोहगाव वायुसेना व नागरी विमानतळाच्या १५ कि.मी. अंतराच्या वायुक्षेत्रात, सायंकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही व्यक्तीने किंवा कार्यक्रम आयोजकांनी प्रखर बीम लाईट्स आकाशात सोडू नयेत.या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत शिक्षेस पात्र राहील.
Reviewed by ANN news network
on
८/११/२०२४ ०८:३०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: