पोलीस अधिकाऱ्यांसाठी २१ लाख रुपये लाच मागणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

 


नवी मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका खाजगी व्यक्तीवर पोलिस अधिकाऱ्यासाठी २१ लाख रुपये लाच मागितल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.

एका व्यक्तीवर ए.पी.एम.सी. पोलीस ठाण्यात दाखल एन.डी.पी.एस. अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्याचे तपास अधिकारी, निरीक्षक निरज चौधरी (अमली पदार्थ विरोधी शाखा, नवी मुंबई) यांनी तक्रारदाराला चौकशीसाठी बोलावले होते.   दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी पोलिसांना देण्याकरिता खाजगी व्यक्ती कपील छंगरानी (रा. सायन, मुंबई) आणि बेलापूर, नवी मुंबईतील पोलीस अधिकारी अरूण पढार  यांनी २५ लाख रुपयांची मागितली होती.

तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानुसार, ३ जुलै २०२४ रोजी केलेल्या पडताळणी दरम्यान, कपील छंगरानीने २१ लाख रुपयांची लाच स्विकारण्याचे मान्य केले होते. तपासादरम्यान, काही रक्कम देण्यास छगरानीने तक्रारदारास प्रवृत्त केल्याचे अ‍ॅन्टीकरप्शनच्या अधिकार्‍यांना दिसून आले आहे.यानंतर, कपील छंगरानीविरुद्ध भ्र.प्र. अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७ अ, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आणि पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधिकाऱ्यांसाठी २१ लाख रुपये लाच मागणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल पोलीस अधिकाऱ्यांसाठी २१ लाख रुपये लाच मागणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ८/११/२०२४ ०७:५२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".