४५ हजार रुपये लाच घेताना अन्नसुरक्षा अधिकार्‍याला अटक

 


कोल्हापूर: अन्नसुरक्षा अधिकारी विकास रोहीदास सोनवणे यांना ४५ हजार रुपये लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूरने रंगेहाथ पकडले आहे. याबाबत एका व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारदार यांची "टेस्ट मॅटर्स" नावाची फरसाण आणि वेफर्स उत्पादन करणारी एक फर्म कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात स्थित आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी अन्नसुरक्षा अधिकारी विकास सोनवणे यांनी फर्मची तपासणी करून बेसन, तेल आणि मिरची पावडरचे नमुने घेतले होते. या नमुन्यांवर कारवाई न करण्यासाठी आणि तक्रारदाराच्या फर्मचा परवाना रद्द न करण्याच्या बदल्यात सोनवणे यांनी ८५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ती रक्कम ४५ हजार रुपयांवर आली होती.

तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो कोल्हापूरकडे या मागणीची तक्रार केली होती. तपासणीदरम्यान ही लाच मागणी खरी असल्याचे निष्पन्न झाल्यावर, २१ ऑगस्ट २०२४ रोजी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोने सापळा रचून सोनवणे यांना तक्रारदाराकडून ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

सोनवणे यांच्याविरुद्ध जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, पुणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली आहे.

४५ हजार रुपये लाच घेताना अन्नसुरक्षा अधिकार्‍याला अटक ४५ हजार रुपये लाच घेताना अन्नसुरक्षा अधिकार्‍याला अटक Reviewed by ANN news network on ८/२२/२०२४ ०१:१९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".