पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ५० हजार रुपयांची लाच घेताना सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात थेट उपजिल्हाधिकाऱ्यांनाच लाच घेताना पकडल्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
वाडा येथील एका आदिवासी खातेधारकाची जमीन नावावर करण्यासाठी जमिनीचे प्रकरण मंजूर करून मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी लाचेची मागणी केली व तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले आहे.
उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी संबंधित व्यक्तीकडे ५० हजार रुपये लाच मागितल्यानंतर त्याने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली.
या संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात १३ ऑगस्ट रोजी सापळा रचून ५० हजार रुपये लाच म्हणून स्वीकारताना संजीव जाधवर यांना पकडले.
Reviewed by ANN news network
on
८/१४/२०२४ ०२:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: