८ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस
पुणे: पुणे पोलिसांनी शहरात वाहन चोरीस आळा घालण्यासाठी विशेष मोहिम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन ८ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईमध्ये ५ दुचाकी आणि ३ ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.या प्रकरणात एकंदर २ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन मध्ये नोंदविण्यात आलेला गुन्हा क्रमांक ३१२/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना, पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना रामनगर, वारजे माळवाडी येथे एक मुलगा चोरलेल्या मोटारसायकलसह उभा आहे अशी माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ३ ऑटो रिक्षा व ५ दुचाकी चोरल्या असल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून ही ८ वाहने जप्त केली.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे,अंमलदार बाळू गायकवाड, प्रदीप राठोड,धनंजय ताजणे,गणेश ढगे,रविंद्र लोखंडे,साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२४ ०३:५१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: