कोल्हापुरात १० वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या

कोल्हापूर: बदलापूरमध्ये दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच, कोल्हापुरात दहा वर्षीय मुलीची बलात्कार करून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिये रामनगर येथील १० वर्षीय परप्रांतीय मुलगी बुधवार दुपारपासून घरातून गायब झाली होती. तिच्या नातेवाईकांनी शिरोली पोलिसात तक्रार दिली होती. शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज गिरी आणि स्थानिक नागरिकांनी शिये रामनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, विहिरी, ओढे, आणि उसाच्या शेतात तपास केला, परंतु कोणताच सुगावा हाती लागला नव्हता. आज या मुलीचा मृतदेह आढळला आहे.

ही घटना परिसरात खळबळ माजवणारी ठरली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कोल्हापुरात १० वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या कोल्हापुरात १० वर्षीय मुलीची अत्याचार करून हत्या Reviewed by ANN news network on ८/२२/२०२४ ०३:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".