पुणे : पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरातील संदेश सोसायटी, सरस्वती बंगला येथे घरफोडी करून सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि नगदी रक्कम चोरी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी दोघा परप्रांतीयांना जेरबंद केले आहे.
सिद्धू भय्यालाल रजपूत (वय ३० वर्षे) आणि अनिलकुमार रामसिंह बल्ली रजपूत (वय २७ वर्षे) अशी आरोपींची नावे असून ते कानेमई अझुवा, तालुका सिराथू, जिल्हा कौशाम्बी, उत्तरप्रदेश येथील राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांना तेथे जाऊन अटक केली आहे.
या प्रकरणी त्यांच्या विरोधात मार्केटयार्ड पोलीस ठाणे येथे १८७/२०२३ क्रमांकाने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.आरोपींकडून १२ लाख ७७ हजार ६८९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास करताना सहायक निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या पथकाला गुन्हा घडलेल्या ठिकाणी हातांचे ठसे आढळले होते. त्यांची छाननी करता एक ठसा आरोपी सिद्धू रजपूत याच्याशी जुळला. त्यांनतर पोलिसांनी ठावठिकाणा काढून त्याला आणि त्याच्या साथीदाराला अटक केली.
ही कामगिरी अप्पर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त आर. राजा, सहायक आयुक्त ध्यानकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक माया देवरे यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकातील सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक सुनिल भापकर आणि अंमलदार अमित जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
८/११/२०२४ ०७:२४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: