बदलापूरमध्ये वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस नाईकावर गुन्हा दाखल

 


बदलापूर: बदलापूर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक किरण शरद गायकवाड (वय ३५ वर्षे) यांच्यावर २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, किरण गायकवाड यांनी त्यांच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यात अटक न करण्याच्या बदल्यात एकंदर ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ४० हजार रुपये घेतलेही होते. उर्वरित ३० हजार रुपयांची मागणी ते तक्रारदाराकडे करत होते. शेवटी त्या ३० हजारांपैकी २५ हजार रुपये घेण्यास ते तयार झाले. आणखी वाटाघाटी केल्यानंतर २० हजार रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती त्यांनी २० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले. यातील ४०,००० रुपयांची रक्कम त्यांनी आधीच स्वीकारली होती आणि उर्वरित ३०,००० रुपयांसाठी पुन्हा मागणी केली होती.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केल्यानंतर, दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणी दरम्यान गायकवाड यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली, त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ (संशोधन २०१८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत बदलापूर पोलिस स्टेशनचे अधिकारी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

बदलापूरमध्ये वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस नाईकावर गुन्हा दाखल बदलापूरमध्ये वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस नाईकावर गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ८/११/२०२४ ०७:३८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".