दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे निवृत्त कृषिविद्या विभागप्रमुख डॉ. भीमराव पाटील ह्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्टस असोसिएशन ( इंडिया) या पुणे येथे 1936 साली स्थापन झालेल्या ख्यातनाम संस्थेतर्फे डॉ. पाटील ह्यांनी गेल्या 40 वर्षांत केलेल्या उल्लेखनीय कृषि सेवेसाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा गौरव केला गेला.
पुण्याच्या जे. डब्लू. मारियट हॉटेलमध्ये 24 ऑगस्ट रोजी आयोजित संस्थेच्या वार्षिंक अधिवेशनात हा सोहळा पार पडला. याप्रसंगी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तांत्रिक चर्चासत्रात डॉ. पाटील ह्यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञान या विषयावर सादरीकरण केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: