पुणे : पुणे शहरातील मार्केटयार्ड परिसरात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या कुटुंबाचे २० लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने बळकावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी २१ वर्षीय आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हर्ष महेंद्र महाडिक (वय २१, रा. गोकुळनगर, कात्रज) याने पीडित मुलीशी मैत्री करून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे ११ डिसेंबर २०२२ ते १० जुलै २०२४ या कालावधीत सॅलेसबरी पार्क, मार्केटयार्ड आणि कल्याणीनगर येथील विविध हॉटेल्समध्ये वारंवार घडले.
आरोपीने पीडितेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करताना त्याचे गुप्त चित्रीकरण केले. नंतर या व्हिडिओंचा वापर करून तिला ब्लॅकमेल केले आणि तिच्या आईचे दागिने मागितले,पीडित मुलीने घाबरून आपल्या आईचे २० लाख ६६ हजार ८२० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने टप्प्याटप्प्याने आरोपीला दिले. घरातील दागिने गायब झाल्याचे लक्षात आल्यावर सर्व प्रकार उघडकीस आला.
सध्या सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२४ १२:०३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: