महिलांच्या सोनसाखळ्या चोरणाऱ्या दोघांना अटक; ९ लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त

पिंपरी : शहरातील महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या साखळ्या हिसकावून पळून जाणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला त्याच्या महिला साथीदारासह पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत सुमारे ९ लाख रुपये किंमतीचे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सादीक शमलखान इराणी (वय ३४, रा. श्रीरामपूर, जि. अहमदनगर) नर्गीस जाफर इराणी (वय ४५, रा. विष्णुकृपानगर, शिवाजीनगर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

 तोंडाला मास्क आणि डोक्यावर हेल्मेट घालून ओळख लपवून, बनावट किंवा विनानंबरप्लेटच्या मोटारसायकलचा वापर करत निर्जन ठिकाणी एकट्या महिला किंवा वृद्धांवर हल्ला करून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून 'धूम' स्टाइलने मोटारसायकल चालवून पळून जाण्याची पद्धत हे दोघे चोरी करताना अवलंबत होते.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा सखोल अभ्यास केला.खबर्‍यांकडून माहिती गोळा केली. आरोपींचा वावर असलेल्या परिसरात टेहळणीसाठी पथके ठेवली. आणि शिताफीने या दोघांना अटक केली.

या दोघांच्या अटकेमुळे 

१. निगडी पोलीस स्टेशन - ३ गुन्हे

२. चिंचवड पोलीस स्टेशन - १ गुन्हा

३. चिखली पोलीस स्टेशन - १ गुन्हा

४. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन - १ गुन्हा

५. चाकण पोलीस स्टेशन - १ गुन्हा

६. स्वारगेट पोलीस स्टेशन - १ गुन्हा

असे ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

मुख्य आरोपी सादीक शमलखान इराणी याच्याविरुद्ध यापूर्वी १९ गुन्हे दाखल असून त्यात चैनस्नॅचिंग आणि फसवणुकीचे गुन्हे समाविष्ट आहेत.

ही कामगिरी निगडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ निरीक्षक शत्रुध्न माळी,  निरीक्षक गुन्हे निलेश वाघमारे, उपनिरीक्षक महादेव यलमार, हवालदार नागरगोजे, युनिट २ चे  उपनिरीक्षक केराप्पा माने, शिवानंद स्वामी, दिपक खरात, दिलीप चौधरी,  हवालदार उषा दळे, अंमलदार अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली.


महिलांच्या सोनसाखळ्या चोरणाऱ्या दोघांना अटक; ९ लाख रुपये किंमतीचे दागिने जप्त महिलांच्या सोनसाखळ्या चोरणाऱ्या दोघांना अटक; ९ लाख रुपये किंमतीचे  दागिने जप्त Reviewed by ANN news network on ८/२८/२०२४ ०१:३०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".