पिंपरी विधानसभेसाठी देवेंद्र तायडे यांना उमेदवारी देण्याची मागणी

पिंपरी :  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक श्रमशक्ती भवन, आकुर्डी येथे पार पडली. या बैठकीत, पिंपरी विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली.

बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना, पक्षाचे शहर सरचिटणीस प्रा. जयंत शिंदे यांनी सांगितले की, राज्यात सत्तापरिवर्तन होण्यासाठी पिंपरीत परिवर्तन आवश्यक आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा पुरोगामी वारसा पुढे घेऊन जाणारे इंजि. देवेंद्र तायडे यांना पक्षाने पिंपरी विधानसभेसाठी प्राधान्याने विचार करावा.  शरद पवार  जो उमेदवार देतील, तो निवडून आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्यकर्ते एकदिलाने प्रयत्न करतील, असा विश्वास प्रा. जयंत शिंदे यांनी व्यक्त केला.

उमेदवारीसाठी आग्रही असणारे देवेंद्र तायडे यांनी सांगितले की, भारिप आणि वंचितचा शहराध्यक्ष म्हणून काम केले आहे. संविधानासमोर संकट उभे असताना पुरोगामी विचारांमधील मतविभागणीचा राजकीय फायदा सांप्रदायिक शक्तींना होऊ नये म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि  शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राहण्याचा निर्णय घेतला. शहरातील कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांनी पिंपरी विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी दिल्यास, कार्यकर्त्यांच्या सामूहिक शक्तीच्या बळावर विधानसभा जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विविध पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र तायडे यांच्या उमेदवारीसाठी आपले समर्थन दर्शवले. वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप यांनी सांगितले की, पिंपरी विधानसभेत तायडे यांच्यासारख्या उमेदवारासह पक्षाला आमदार मिळवण्यासाठी सर्व कार्यकर्ते कटिबद्ध आहेत. महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या भूमिकेनुसार महिलांना सन्मानाची वागणूक देण्याचे श्रेय देवेंद्र तायडे यांना दिले. युवक अध्यक्ष इम्रान शेख यांनी तायडे यांचे नेतृत्व अत्यंत सक्षम असल्याचे सांगितले.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात होताच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी शहरातील पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र तायडे यांच्या उमेदवारीसाठी रणशिंग फुंकले आहे. बैठकीचे प्रास्ताविक मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी केले, सूत्रसंचालन विशाल जाधव यांनी केले आणि आभार शहर संघटक विवेक विधाते यांनी मानले.

पिंपरी विधानसभेसाठी देवेंद्र तायडे यांना उमेदवारी देण्याची मागणी  पिंपरी विधानसभेसाठी देवेंद्र तायडे यांना उमेदवारी देण्याची मागणी Reviewed by ANN news network on ८/२१/२०२४ ०३:२८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".