परराज्यातील होंडा सिटीने वाहने आणि पादचार्‍यांना उडविले (VIDEO)


उरण तालुक्यातील द्रोणागिरी नोडमध्ये हिट अ‍ॅन्ड रनची घटना 

विठ्ठल ममताबादे

उरण : उरण तालुक्यातील सिडकोच्या अखत्यारीत असलेल्या द्रोणागिरी नोडमध्ये २४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजता द्रोणागिरी देवकृपा बसस्टँडजवळील देवकृपा चौकात, उरण पनवेल रोडवर, हरियाणाची पासिंग असलेल्या एका भरधाव होंडा सिटी कारने ४ ते ५ पादचाऱ्यांना उडवले. या अपघातात समीर गॅरेज समोर उभ्या असलेल्या ७ ते ८ मोटारसायकलींवर आणि एका हातगाडीवर जोरदार धडक दिली. या धडकेमुळे एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर वाहन चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

या घडलेल्या हिट अँड रन प्रकाराने येथील रहिवासी आणि प्रवासी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

सिडकोच्या विस्तारीकरणानंतर द्रोणागिरी नोडमध्ये वाहतूक समस्या अधिकच वाढल्या आहेत. रस्त्याच्या कडेला लावलेल्या हातगाड्या, भर रस्त्यात भरणारा आठवडा बाजार, तसेच सिग्नलच्या अभावामुळे वाहतूक नियमन करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. वेळीच परिस्थिती सुधारली नाही तर येथे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

सिडकोने द्रोणागिरी नोड विकसित केला असला तरी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अजूनही गंभीर आहे. द्रोणागिरीतील रहिवासी आणि प्रवासी नागरिकांनी वाहतूक नियमांच्या पालनासाठी आणि सिग्नल व्यवस्था उभारण्यासाठी प्रशासनाच्या वतीने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

परराज्यातील होंडा सिटीने वाहने आणि पादचार्‍यांना उडविले (VIDEO)  परराज्यातील होंडा सिटीने वाहने आणि पादचार्‍यांना उडविले (VIDEO) Reviewed by ANN news network on ८/२५/२०२४ ०१:४८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".