नाशिक : नाशिक येथे असलेल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत एका महिला पोलीस कर्मचार्यावर अकादमीतील साफसफाईचे कंत्राट घेतलेल्या बीव्हीजी कंपनीच्या कर्मचार्याने बेदम मारहाण करून बलात्कार केला. एव्हढेच नव्हे तर या प्रकाराचा व्हिडिओही तयार केला. या धक्कादायक प्रकारामुळे पोलीस अकादमीत खळबळ माजली आहे.
या प्रकरणी त्या महिलेने गंगापूर पोलीसठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
आरोपी आणि पीडित महिला पोलीस कर्मचारी यांच्यात प्रेमसंबंध होते. अकादमीच्या कर्मचारी वसाहतीत हा प्रकार घडला. आरोपीने त्या महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी केली. त्यास त्या महिलेने नकार दिल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तिला रात्रभर बेदम मारहाण केली. या सर्व प्रकाराची व्हिडिओ क्लिपही तयार केली.
पीडित महिला सध्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: