केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे निषेध

पिंपरी: बालेवाडी येथे नुकत्याच झालेल्या भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याबद्दल खालच्या स्तरावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने तीव्र निषेध केला आहे. पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून शाह यांच्या वक्तव्याचा विरोध केला.

शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले की, "शरद पवार हे महाराष्ट्राच्या जनतेचे आदरणीय नेते आहेत. बाहेरून येऊन त्यांच्यावर टीका करणे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान आहे. अमित शाह यांनी ज्या वास्तूत उभे राहून पवार साहेबांवर टीका केली, ती वास्तू त्यांच्या प्रयत्नांतून उभी राहिली आहे. स्थानिक भाजप पदाधिकारी यावेळी शांत राहिले हे अधिकच दुर्दैवी आहे."

कामठे यांनी इशारा दिला की, "आम्ही अमित शाह यांना पुढे कधीही पुण्यात आल्यास काळे झेंडे दाखवून निषेध करू."

या निषेध आंदोलनात प्रदेश युवक सचिव प्रशांत सपकाळ, माजी नगरसेवक विनायक रणसुभे, कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे, आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे निषेध केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे निषेध Reviewed by ANN news network on ७/२४/२०२४ १२:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".