कथक नृत्यातून प्रकटला 'गुरु समर्पण'भाव !

लयशाला ललित कला फाउंडेशन कडून आयोजन 

पुणे:लयशाला ललित कला फाउंडेशन(वाघोली) च्या विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित 'गुरु समर्पण' या कथक नृत्य कार्यक्रमाला मंगळवारी सायंकाळी  चांगला प्रतिसाद मिळाला.गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने गुरु आणि परंपरेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या विशेष नृत्य कार्यक्रमात कथकच्या विविध रचना सादर करण्यात आल्या.त्यात गुरुवंदना,पारंपरिक कथक,शिव स्तुती,राम स्तुती,तराणा यांचा समावेश होता. दि.२३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता ओझोन विला क्लब हाऊस(वाघोली) येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

केअर हॉस्पिटलचे संस्थापक डॉ.चंद्रकांत कोलते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.नृत्यगुरु आस्था गोडबोले-कार्लेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या सादरीकरणामध्ये आद्या बोरवणकर,आराध्या सिन्हा,प्रीषा काकोडे,श्रिया साळुंखे,प्रिषा बडगुजर,आद्या चौरसिया,अन्वी सिन्हा,भाव्या सिंग,अनहद,आशिर्या या शिष्यांचा समावेश होता.कथक नृत्याच्या विशेष प्रशिक्षणासाठी केंद्र सरकारच्या सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग (सीसीआरटी)ची शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या मल्लिकार्जुन कार्लेकरचा सत्कार करण्यात आला.भाव्या सिंग,आराध्या सिन्हा ने सूत्रसंचालन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थापन विद्यार्थ्यांनी केले.आद्या बोरवणकर,अवनी शर्मा यांनी आभार मानले.सोहा कार्येकर यांचा विशेष सहयोग या कार्यक्रमाला लाभला. 

कथक नृत्यातून प्रकटला 'गुरु समर्पण'भाव !  कथक नृत्यातून प्रकटला 'गुरु समर्पण'भाव ! Reviewed by ANN news network on ७/२४/२०२४ १२:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".