पुणे : बारामतीतील सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयातील सहकार अधिकार्याला १९ जुलै रोजी अॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने साडेचार हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
अनिलकुमार संभाजी महारनवर, वय ४६. असे या अधिकार्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात एक ३५ वर्षांच्या व्यक्तीने तक्रार दिली होती.
तक्रारदाराच्या जमिनीसंदर्भात सहायक निबंधकांकडे दावा दाखल आहे.या दाव्यात विभागीय सह निबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्याकडून त्याला स्थगिती आदेश मिळाला आहे. त्याची प्रत निबंधक कार्यालयात जमा करण्यासाठी तक्रारदार गेला असता.आरोपी महानवर यांनी काम करण्यासाठी आणि या दाव्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे ५ हजार रुपये लाच मागितली. वाटाघाटीनंतर साडेचार हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
अॅन्टीकरप्शनच्या पथकाने सहायक निबंधक सहकारी संस्था, बारामती कार्यालयात ही रक्कम स्वीकारताना महानवर यांना पकडले.
या प्रकरणी बारामती शहर पोलीसठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस अधीक्षकअमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
Reviewed by ANN news network
on
७/२२/२०२४ ०२:५८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: