पुणे महापालिकेच्या अभियंत्याने ठेकेदाराला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावले

 पुणे : पुणे महापालिकेच्या एका ठेकेदाराला पालिकेच्या मलनि:सारण खात्यातील एका कनिष्ठ अभियंत्याने आणि त्याच्या भावाने रिव्हॉल्व्हर दाखवून शिवीगाळ केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

हा प्रकार २१ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गंजपेठ परिसरात घडला. या प्रकरणी ठेकेदार निर्मल मोतीलाल हरिहर (वय-३६, रा. मंगल क्लब मित्र मंडळाजवळ, गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून कनिष्ठ अभियंता गणेश राजेंद्र गिते (वय-३७) आणि त्याचा भाऊ महेश (वय-३५, दोघे रा. किराड गल्ली, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार निर्मल हरिहर पुणे महापालिकेची ठेकेदारीची कामे करतात. २१ जुलै रोजी ते बालेवाडी येथे भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला जाण्याच्या तयारीत गंज पेठेतील मंगल क्लब मित्र मंडळाशेजारी उभे होते.

त्यावेळी महापालिकेच्या मलनि:सारण विभागातील कनिष्ठ अभियंता गणेश गिते आणि त्याचा भाऊ महेश त्या ठिकाणी आले. त्यांनी हरिहर यांच्या पोटाला  रिव्हॉल्व्हर लावून जातीवाचक शिवीगाळ केली. ‘तू दहा कोटी रुपयांचे टेंडर भरतो काय? तुझी लायकी काय?’ असे म्हणत हरिहर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

पुणे महापालिकेच्या अभियंत्याने ठेकेदाराला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावले  पुणे महापालिकेच्या अभियंत्याने ठेकेदाराला  रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावले Reviewed by ANN news network on ७/२२/२०२४ ०४:३४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".