गुरे चोरून वाहतूक करण्यासाठी कार चोरणारा अटकेत

 


विरार: चोरलेल्या गुरांची वाहतूक करण्याकरिता कार चोरणार्‍या एका दाखलेबाज गुन्हेगाराला विरार पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरलेली इको कार जप्त करण्यात आली आहे.

आरोपी अरबाज अतिक मिसाळ (वय २४, रा. आलोबा चाळ, वाजा मोहल्ला, नालासोपारा पश्चिम, वसई, पालघर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक १३ जून २०२४ रोजी रात्री १०.३० ते १४ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० च्या दरम्यान पालघर जिल्ह्यातील वसई, सकवार, वरठापाडा येथील घर क्रमांक ४७७ च्या आवारात पार्क केलेली ३,००,००० रुपये किमतीची सफेद रंगाची ईको कार (रजिस्ट्रेशन क्रमांक MH 48 BT 7410) चोरीला गेली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास आणि आरोपीची अटक 

पोलीस उप आयुक्त गुन्हे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या सूचनांनुसार गुन्हे शाखा कक्ष-३ विरारच्या पथकाने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आणि मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपीला दिनांक १५ जुलै २०२४ रोजी चोरी केलेल्या ईको कारसह ताब्यात घेण्यात आले.

आरोपीच्या इतर गुन्ह्यांची माहिती 

आरोपीकडे प्राथमिक तपास केला असता, त्याच्याविरुद्ध वाहन चोरी आणि गुरे चोरीचे अनेक गुन्हे नोंदवलेले आढळले. त्याच्यावर खालील गुन्हे दाखल आहेत:

मांडवी पोलीस ठाणे: गु.र.क्र. १६५/२०२४, भादंवि कलम ३७९, ३४

नालासोपारा पोलीस ठाणे: गु.र.क्र. १९४/२०२४, भादंवि कलम १७९ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ११ सह महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १ (ए), ५ (ब)

वालीव पोलीस ठाणे: गु.र.क्र. १३२२/२०२३, भादंवि कलम ३७९, ३४

वालीव पोलीस ठाणे: गु.र.क्र. ३९२/२०२३, भादंवि कलम ३७९, ४२९, ३४ सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम ११, ४७, ४८, ५१, ५४, ५६

डहाणू पोलीस ठाणे (पालघर): गु.र.क्र. १२३/२०२३, भादंवि कलम ३८२, ४६७, ४६८, ४७०, ४२९, ४२७

आरोपीला पुढील कारवाईसाठी मांडवी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

यशस्वी तपास पथक

ही कामगिरी पोलीस आयुक्त  मधुकर पांडेय, अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे,  उप आयुक्त (गुन्हे)  अविनाश अंबुरे, सहाय्यक आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक उमेश भागवत, हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, अंमलदार राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, मनोज तारडे, तुषार दळवी, आतिश पवार, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि सायबर सेलचे सहायक फौजदार संतोष चव्हाण यांनी केली.

गुरे चोरून वाहतूक करण्यासाठी कार चोरणारा अटकेत गुरे चोरून वाहतूक करण्यासाठी कार चोरणारा अटकेत Reviewed by ANN news network on ७/१७/२०२४ ०४:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".